बुलढाण्यातील लोक अचानक टकले का झाले? अखेर झाला उलगडा; तुम्हीही ही चूक करत नाही ना?

 बुलढाण्यातील लोक अचानक टकले का झाले? अखेर झाला उलगडा; तुम्हीही ही चूक करत नाही


बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केसगळतीचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थांच्या केस आणि दाढीचे केस वेगाने गळत आहेत, त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. प्राथमिक तपासणीत दूषित पाण्यात नायट्रेटचा उच्च प्रमाण आढळला आहे, जो केसगळतीचे एक कारण असू शकतो.

देशात एचएमपीव्ही या व्हायरसने दस्तक देऊन नागरिकांमध्ये दहशत माजवलेली असतानाच बुलढाण्यात वेगळ्याच आजाराने डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बुलढाण्यातील शेगावमधील ग्रामस्थ अचानक टकले होत आहेत. त्यांचे डोक्याचे आणि दाढीचे केस अचानक गळू लागले आहेत. त्यामुळे गावात जो तो टकला दिसत आहे. पुरुषच नाही तर महिलांमध्येही ही समस्या दिसत आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हा काय प्रकार आहे? ही भानामती आहे की वेगळाच काही व्हायरस आहे, अशी चर्चा गावात सुरू आहे. या प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली असून या सर्व प्रकारामागचं कारणही समोर आलं आहे.

काय आहेत लक्षणं ?

या गावातील लोकांना डोक्याला आधी खाज येते. त्यानंतर हळूहळू केस गळू लागतात आणि तीन दिवसातच संपूर्ण टक्कल पडत आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दाढीचेही केस गळत असल्याने गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. एकट्या बोंडगावात 16 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. बालाजी आद्रट यांनी दिली आहे.


कोणत्या गावात किती लोक झाले टकले ?


बोंडगाव – 16 रुग्ण


कालवड – 13 रुग्ण


कठोरा – 7 रुग्ण


भोनगाव – 3 रुग्ण


हिंगणा वैजनाथ – 6 रुग्ण


घुई – 7 रुग्ण