मेष( २९ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ )
मेष : व्यवहाराला गती येईलदिनांक ५ रोजी महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये बऱ्याच काही गोष्टी वेगाने होतात, त्यासाठी कोणता संघर्ष करावा लागत नाही किंवा कोणाच्या मागेही लागावे लागत नाही. समोरून येणारे प्रस्ताव सकारात्मक असल्याने कामे वेळेत पूर्ण होतात. प्रत्येक गोष्टीत चांगला आणि पर्यायी मार्गच मिळेल. सध्या तरी व्यवसायात चढउतार जाणवणार नाही. नोकरदार वर्गाला कामाचे स्वरूप कळेल. आर्थिक व्यवहाराला गती येईल. कामे पूर्ण होतील. सार्वजनिक कार्यात सहभाग राहील. मुलांसाठी वेळ देता येईल. जोडीदाराकडून तुम्हाला जी अपेक्षा आहे ती जोडीदार पूर्ण करणार आहे. तरुण वर्गाचे विवाह ठरतील. प्रकृती उत्तम राहील.
शुभ दिनांक : ८, ९
महिलांसाठी : भरकटलेले मन स्थिर होईल.
वृषभ( २९ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ )
वृषभ :विचार करून बोला
७ तारखेला दुपारनंतर दिनांक ८ आणि ९ हे संपूर्ण दोन दिवस असा हा अडीच दिवसांचा कालावधी जेमतेम राहील. या कालावधीत सहनशीलता वाढवावी लागेल. काही गोष्टी अशा असतात की त्या तुम्हाला कोणासमोर आणायच्या नसतात. परिस्थितीच अशी निर्माण होते की काहीही न करता ती परिस्थिती सर्वांसमोर येते आणि तुम्हाला बोलावेच लागते. राग वाढतोच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठ्याने बोलणे टाळा. आपले मत हळुवारपणे व्यक्त करा म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा. राजकीय क्षेत्रात कौतुक होईल. कुटुंब पाठीशी राहील. योगसाधनेला महत्त्व द्या. आनंदी राहा.
शुभ दिनांक : ६, १०
महिलांसाठी : संवाद साधताना जुन्या गोष्टींवर चर्चा करत बसू नका. नवीन गोष्टींचा विचार करा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
मिथुन( २९ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ )
मिथुन : अनेक क्षेत्रांत सरस
दिनांक १०, ११ हे दोन दिवस शुभ आहे. तेव्हा या दिवसांत कोणतेही काम करताना संयम ठेवा. इतरांनी सांगितले म्हणून करावे, असे करू नका. तुम्हाला त्या गोष्टी पटत असतील तरच पुढे जा; अन्यथा जाऊ नका. प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक हाताळा. बेकायदेशीर गोष्टींचा अवलंब करू नका. वादविवाद टाळा. नकारात्मक विचार करू नका. स्वत:वर नियंत्रण ठेवा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळेल. अनेक क्षेत्रात सरस राहाल. नोकरदार वर्गाचा कामातील अनुभव चांगला असेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा होईल. मित्र-मैत्रिणींच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. संततीचे लाड पुरवाल. नातेवाईकांशी संवाद साधाल. भावंडांना मदत कराल. धार्मिक गोष्टींसाठी वेळ द्याल. प्रकृतीविषयक चिंता मिटेल.
शुभ दिनांक : ८, ९
महिलांसाठी : अनुभवातून बरेच काही शिकाल.
कर्क( २९ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ )
कर्क : भरीव कार्य कराल
दिनांक ५ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. चंद्रग्रहाचे भ्रमण भाग्य स्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. बऱ्याच दिवसांपासून मनामध्ये जी खंत होती, ती आता निर्माण होणार नाही. कारण चिंता मिटणारेच ग्रहमान आहे असे म्हणायला हरकत नाही. चांगल्या दिवसांमध्ये भरीव कार्य कराल, ज्यामुळे आगामी काळासाठी चांगली तरतूद होईल. बऱ्याच दिवसांतून त्रास कमी होणार आहे. व्यवसायात नफा चांगला राहील. नोकरदार वर्गाला मोठी जबाबदारी मिळेल. आर्थिक बाबतीत समाधानी राहाल. समाजसेवेची आवड राहील. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने गप्पांमध्ये रंगून जाल. मुलांची प्रगती होईल. घरगुती वातावरण चांगले राहील. आरोग्य साथ देईल.
शुभ दिनांक : ७, १०
महिलांसाठी : कामात व्यस्त राहाल. मन आनंदी राहील.
सिंह( २९ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ )
सिंह : सवलत मिळेल
५ तारखेला दुपारनंतर दिनांक ६ व ७ हा अडीच दिवसांचा कालावधी फारसा अनुकूल नाही. या कालावधीत कोणतेही काम करताना दूरदृष्टी हवी. प्रत्येक गोष्टीत आपले तेच खरे असे करत बसू नका. इतरांचे ऐकून घ्या, मात्र त्यावर प्रतिक्रिया देणे टाळा. इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये महत्त्वाच्या कामाला सुरुवात करा. व्यवसायात बरीच मोठी उलाढाल होईल. फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला नवीन कामात सवलत मिळेल. नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिक बचत करा. सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याची उत्सुकता राहील. नातेवाईकांशी कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. भावंडांशी संवाद साधाल. शेजाऱ्यांना मदत कराल. धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. मानसिक-शारीरिक स्वास्थ्य जपा.
शुभ दिनांक : ८, ९
महिलांसाठी : स्वत:वर विश्वास ठेवा.
कन्या( २९ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ )
कन्या : पथ्यपाणी सांभाळा
षष्ठ स्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण सर्व दिवस काळजीपूर्वक हाताळा असे सांगते. कारण या दिवसांत कोणतेही काम करताना उशीर गृहीत धरा. प्रत्येक गोष्ट वेळेत होईल याची शक्यता कमी असते, त्यामुळे तुमची मानसिकता बिघडून जाते. तेव्हा स्वत:वर नियंत्रण ठेवा. इतरांना सल्ला देणे टाळा. वारंवार होणारे बदल स्वीकारा, म्हणजे त्रास होणार नाही. व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. अनावश्यक खर्च टाळा. राजकीय क्षेत्रात बोलताना भान ठेवा. मित्र परिवाराशी जेवढ्यास तेवढे राहा. कौटुंबिक वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. मानसिक ताणतणाव घेऊ नका. पथ्यपाणी सांभाळा.
शुभ दिनांक : १०, ११
महिलांसाठी : भावनिक गोष्टींपेक्षा व्यवहारात्मक गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.
तूळ( २९ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ )
तूळ : नियमांचे पालन करा
५ तारखेला दुपारनंतर व ६, ७, १०,११ हे दिवस फारसे अनुकूल नाहीत. त्यामुळे या दिवसांत कोणताही सोक्षमोक्ष लावायला जाऊ नका. कारण काही गोष्टी अशा असतात त्या पटकन बोलून दाखवल्यामुळे वाद वाढू शकतो. अशा वेळी शांत राहून तोडगा काढणे हेच फायद्याचे ठरते. बेकायदेशीर गोष्टींपासून लांब राहा. नियमांचे पालन करा. तर्कशुद्ध पद्धतीने विचार करा, म्हणजे त्रास होणार नाही. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव सध्या तरी साध्य होणार नाही. व्यवसायात चढउतार राहील. नोकरदार वर्गाला कामासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. आर्थिक नियोजन पक्के करावे लागेल. समाजमाध्यमापासून लांब राहिलेले चांगले. कौटुंबिक वादविवाद टाळा. जोडीदाराचा आदर करा. प्रकृती स्वास्थ्य जपा.
शुभ दिनांक : ८, ९
महिलांसाठी : समतोल साधण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक( २९ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ )
वृश्चिक : अतिसाहस टाळा
७ तारखेला दुपारनंतर दिनांक ८ व ९ असे दोन दिवस म्हणजेच अडीच दिवसांचा कालावधी अनुकूल नाही. असे दिवस असले की तुमची मानसिकता नेमकी बिघडते. नको त्या गोष्टी उकरून काढता आणि स्वत:च त्रास करून घेता. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे कसे होईल याच गोष्टींकडे तुमचे लक्ष लागून राहते आणि मग नको ते बोलून जाता. दोन शब्द कमी बोललेले केव्हाही चांगले. या कालावधीत अतिसाहस टाळा. समतोल राखण्याचा प्रयत्न करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात समतोल स्थिती राहील. नोकरदार वर्गाला कामामध्ये विकास साधता येईल. अनावश्यक खर्च टाळा. समाजसेवा करा, पण ती करताना भान ठेवा. मुलांकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराची साथ मिळेल. प्रकृती ठीक राहील.
शुभ दिनांक : ६, १०
महिलांसाठी : शांत राहणे सर्वात उत्तम राहील.
धनु( २९ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ )
धनू : बदल स्वीकारा
दिनांक १०, ११ हे दोन दिवस टांगती तलवार राहणार आहे. या दोन दिवसांत तुमचा तोंडावर ताबा राहणार नाही. होऊन गेलेल्या गोष्टींवर तर्कवितर्क लावत बसू नका. ज्यावेळी तुम्ही समोरच्याला दोष देता त्यावेळी तुमचेही काहीतरी चुकलेले असते हे लक्षात ठेवा. दरवेळी माझेच बरोबर असे करून चालणार नाही. स्वत:चे काम स्वत: करायला शिकावे हा तुमचा अट्टहास असेल. चांगल्या गोष्टी होण्यासाठी बदल स्वीकारा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात गुंतवणूक कराल. नोकरदार वर्गाचा रुबाब वाढेल. आर्थिक बाबतीत आपली आवक पाहूनच जावक ठरवा. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होईल. मुलांचे अतिलाड करणे टाळा. धार्मिक विधी पार पाडाल. घरगुती वातावरण ठीक राहील. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक : ८, ९
महिलांसाठी : इतरांच्यात हस्तक्षेप करण्यापेक्षा स्वत:कडे लक्ष द्या.
मकर( २९ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ )
मकर : योजना यशस्वी होतील
सप्ताहात सर्व दिवस चांगले आहेत. चांगले दिवस असले की तुम्ही काम बाजूला ठेवता आणि अगदी मनोरंजनात रमून जाता. चांगल्या दिवसांत काय करावे काय करू नये याची समजसुद्धा तुम्हाला राहत नाही. मनाला बरे वाटेल अशाच गोष्टी तुम्ही करता- भले त्या गोष्टीतून त्रास असला तरी; तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, सध्या दिवस चांगले आहेत. कामाला लागा. आळस करत बसू नका. तुमच्या योजना यशस्वी होतील. व्यवसायात अग्रेसर राहाल. नोकरदार वर्गाला एक पाऊल जास्तीचे उचलता येईल. आर्थिक ताण कमी होईल. समाजसेवेची आवड राहील. नातेवाईकांशी मनमोकळेपणाने गप्पा माराल. भावंडांशी संपर्क साधाल. धार्मिक कार्यात सहभाग राहील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
शुभ दिनांक : ९, १०
महिलांसाठी : पारंपरिक गोष्टींची आवड राहील.
कुंभ( २९ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ )
कुंभ : मानसिक समाधान लाभेल
गुरू, चंद्र या शुभ ग्रहांची साथ उत्तम राहील. आजपर्यंतचा प्रवास असा होता की प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते. सध्या मात्र यश मिळणारे दिवस आहेत. अगदी ठरवून ठेवल्याप्रमाणे काम वेळेत होईल, त्यामुळे तुमचा कामातील उत्साह वाढेल. उद्याचे काम आजच करावे अशीही मानसिकता होईल. सध्या आपले काम होणार आहे हे विसरू नका. कोणत्याही कामातला अंदाज अचूक असेल. कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. व्यवसायात खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतील. नोकरदार वर्गाच्या कामकाजात पारदर्शकता येईल. आर्थिक लाभ होईल. समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. जोडीदार आनंदी असेल. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती उत्तम राहील.
शुभ दिनांक : ६, ७
महिलांसाठी : आनंदी राहाल.
मीन( २९ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ )
मीन : शुभ सप्ताह
दिनांक ५ रोजीचा दुपारपर्यंतचा फक्त अर्धा दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. काम कोणतेही असो, पण त्या कामांमध्ये नेहमी तुमची द्विधावस्था होते आणि अशा वेळी होणारे सकारात्मक कामही नकारात्मक होते. अशा वेळी तुम्ही एका मतावर ठाम राहणे गरजेचे असते आणि सध्या तुमचीही अशी मानसिकता होऊ शकते, कारण कोणताही अडथळा जाणवणार नाही. काम हातात घेतले आणि ते पूर्ण झाले नाही असे होणार नाही. परिणामी तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कामे मार्गी लागतील. व्यवसायात लाभाचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाचे कामातील वातावरण पूरक असेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. नातेवाईकांची भेट होईल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. एकूणच शुभ काळ असेल. प्रकृती उत्तम राहील.
शुभ दिनांक : ७, ८



